मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोंढापुरी गावात खंडोबा मंदिर परिसरात वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मंदिर परिसरात विविध प्रकारची झाडे लावून हरित वातावरणनिर्मिती करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळाच्या सभोवताल स्वच्छता, परिसर सुशोभीकरण आणि श्रमदान करून ग्रामस्थांनी स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे गावातील धार्मिक स्थळ अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनले असून ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय ठरला आहे.