कोंढापुरी हे गाव ऐतिहासिक वारसा असलेले पुणे-अहिल्यानगर रोडवरील भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असुन महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६० वरील पुणे शहरापासून ४५ किमी अंतरावर तर शिरूर तालुक्यापासून २७ किमी अंतरावर आहे
इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार, कोंढापुरी गावाची लोकसंख्या ३०९१ आहे, यांपैकी पुरुष संख्या १६०४ तर स्त्रियांची संख्या १४८७ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ३९० असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या ३७८ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८४ आहे.
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते
शहराची परंपरा, महानता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवा
नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.