शिरुर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली स्वच्छ, सुंदर, हरित आनंदनगरी म्हणजेच कोंढापुरी. निसर्गाच्या सानिध्यात परिसर हिरवा आणि गावच्या वैभवात भर टाकतात. ऐतिहासिक बारवा, १६३१ मधील भागीरथी बारव, अंधेरी बारव, पाणवठ्याची बारव या बारवा गावाने विशेष लक्ष देऊन जपल्या आहेत. गावामध्ये सुंदर असे पांडवकालीन मंदिर आहे. गावाचे एकुण क्षेत्रफळ १३१९.२१ असुन गावची लोकसंख्या ३०९१ आहे. गावामध्ये एकुण ९०० कुटुंब वास्तव्यास आहेत.
तरुणांच्या पुढाकारातुन, विविध कंपन्यांच्या माध्यमातुन जलसंधारणाची कामे खोलीकरण, रुंदीकरण, तसेच अनेक बंधारे बांधण्यात आले. २०१३ साली जि.प.शाळेची सुसज्ज इमारत लोकवर्गणीतून उभारण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये जेव्हा दुष्काळाचे सावट आले तेव्हा लोकांनी जिवंत झरे शोधले. राळेगण सिध्दीची प्रेरणा घेऊन आदरणीय आण्णांच्या पाठिंब्यातुन ११०० झाडे दरवर्षी गावामध्ये लावली जातात. गावामध्ये कचरा वाहुन नेण्यासाठी घंटागाडी असुन आधुनिक पध्दतीने कचऱ्याचे विलगीकरण कले जाते. लोकसहभागातुन रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका घेण्यात आलेली आहे. गावामध्ये ग्रा.पं. मालकीची व्यायामशाळा असुन तरुणांसाठी खुप फायदेशीर ठरलेली आहे. गावामध्ये पक्षांचा सहभाग असुन पक्षीसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जाते. शहरात कामाला असणारे व्यवसाय, नोकरदार चैत्र पौर्णिमेला पांडवकालीन हनुमान मंदिरात एकत्र येवुन सुंदर हरित आणि विकसीत विकासाबाबत चर्चा करतात. गावाने लोकसहभागातुन विविध उपक्रम राबवत पंचक्रोशीत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नावलौकीक मिळवला आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्ह्याचा प्रथम क्रमांकाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
“गाव हा विश्वाचा नकाशा गावावरुन देशाची परीक्षा” अशा पध्दतीने या ठिकाणी साकारलेला माझा गाव, या गावाचे अतिशय सुंदर देखण आणि गोजिरवाणे रुप तुमच्यापुढे सादर करत असताना मनस्वी खुप आनंद होत आहे.
। । ग्रामपंचायतीने विकासाची घोडदौड केली सुरु । ।
। । ठरविले सर्वांनी आता गाव स्मार्ट ग्राम करु । ।
स्मार्ट ग्राम करण्याची लाट गावात उसळली आणि कोणत्याही परिस्थितीत गाव स्मार्ट करायचाच या उद्देशाने गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, सर्व कर्मचारी आणि या गावातील प्रत्येक नागरीक आपापल्या परीने गावच्या विकासकार्यात सहभागी झाले. लोकसहभाग मिळवुन बऱ्यापैकी गावचा विकास करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. स्वच्छतेमध्ये नटलेला गाव याठिकाणी मला सांगता येईल. १००% शौचालय आणि परिसर स्वच्छता महास्वच्छता अभियान राबविले. महाश्रमदान स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी ठराव आणि अंमलबजावणी करण्यात आली.
पाणी गुणवत्ता तपासणी, प्रत्येक घराला नळ पाणीपुरवठा तेजोमय वाटचाल करुन देतो. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, रोपवाटिका, दत्तक झाड योजना, मुलगी जन्मलेल्या कुटुंबास १० रोपे ग्रा.पं. माध्यमातुन देण्यात आली. जलसंधारणाची कामे करण्यात येवुन दुष्काळाशी दोन हात करण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत पाण्याची तहान भागविण्यात आली. नागरिकांना नदी वाचवा चा अनोखा संदेश देण्यात आला. मूठभर धान्य पक्षांसाठी या उपक्रमाअंतर्गत मल्हार वनराई परिसरात वृक्षसेवा करण्यात आले. थोडक्यात असे म्हणता येईल.
भाजी बनविताना आधी द्यावी लागते फोडणी ।
पाणी गुणवत्तेच्या जोडीला १००% नळजोडणी ।
मनातुन ठरविले तर कोणतीच गोष्ट नसते अवघड ।
ग्रा.पं. मालकीच्या रोपवाटिका करुन केली देशी वृक्षांची लागवड ।
जलसंधारणाच्या कामांमुळे गाव झाले पाणीदार ।
गावची शोभा वाढविताना आज झाडे हिरवीगार ।
निसर्गासारखा नाही सोयरा ।
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे गाव सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले. पायाभुत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण सुविधा, सुकन्या समृध्दी योजना बेटी नव्हे बचाओ, बेटी पढाओ उपक्रम, महिला बचत गटांची निर्मिती अपारंपारिक उर्जा स्त्रोत निर्मिती, नेत्रतपासणी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ग्रा.पं.च्या माध्यमातुन करण्यात आला.
राबवुनी उपक्रम अभिनव ।
ग्रामविकासातुन निर्मिले ग्रामवैभव ।
सोयीसुविधांचा होता खुप अभाव ।
काम करण्याचा होता येथे वाव ।
गावच्या विकासासाठी जेव्हा एकवटले गाव ।
स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवुन ।
मिळवले पुणे जिल्ह्यात नाव ।