ग्रामपंचायत कोंढापुरी येथे मंगळवार, दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:15 वाजता नवीन घंटागाडीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या उपक्रमातून स्वच्छता जनजागृतीला चालना देत ग्रामस्थांच्या सोयीसाठी घराघरातून कचरा संकलनाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे.