ग्रामपंचायत कोंढापुरी तर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायतीतर्फे प्लास्टिक बंदीचा ठराव करून ग्रामस्थांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली.
प्लास्टिक हा आपल्या पर्यावरणासाठी घातक कचरा असून जमिनीची सुपीकता कमी करणे, जलप्रदूषण आणि जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम घडवणे आदी गंभीर समस्या निर्माण करतो. आपण सर्वांनी मिळून “प्लास्टिकमुक्त कोंढापुरी” हे ध्येय ठेवून सजग पावलं उचलणं गरजेचं आहे.
जनजागृतीसाठी संदेश
- प्लास्टिकचा वापर टाळा, कापडी पिशवीचा स्वीकार करा.
- एकदाच वापरायाच्या वस्तूंपेक्षा पुनर्वापरयोग्य वस्तूंचा आग्रह धरा.
- पिढ्यांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ पर्यावरणासाठी प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार घ्या.
- #माझीवसुंधरा, #प्लास्टिकमुक्तगाव