“आपला संकल्प विकसित भारत” या उपक्रमांतर्गत १०० टक्के लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याच्या उद्देशाने “लाभ रथ यात्रा मोहीम” राबविण्यात येत आहे.
या यात्रेद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवून, प्रत्येक पात्र व्यक्तीला योजनांचा लाभ मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे.
मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट
- सरकारी योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे
- १००% लाभ सुनिश्चित करून “विकसित भारत” निर्माण करणे
- नागरिकांना प्रत्यक्ष माहिती देऊन शंका निरसन करणे
- जनजागृतीबरोबरच संकल्पपूर्तीचे ध्येय साध्य करणे
जनतेसाठी संदेश
- चला, पुढाकार घेऊया… प्रत्येक हक्काचा लाभ घेऊया.
- आपला हक्क – आपल्यापर्यंत; संकल्पातून विकासाकडे!
- #आपला_संकल्प_विकसित_भारत #लाभरथयात्रा